पुसद तहसील कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थी विशेष पद भरतीसाठी उपोषणास कॉग्रेस पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा :- डॉ. मोहम्मद नदीम…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रहेमान चव्हाण ; 9657176148
पुसद :- 14 ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी पुसद यांना दिलेल्या निवेदनावर कार्यवाही न झाल्याने पुसद तहसीलदार कार्यालय परिसरात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपोषणास सुरुवात केली.
या उपोषणात तरुणी व तरुणांचा सक्रीय सहभाग आहे.
उपोषणाची तीव्रता लक्षात घेत आज रोजी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ. मोहम्मद नदीम,प्रदेश उपाध्यक्ष ऍड. सचिनभाऊ नाईक यांच्या नेतृत्वात पुसद तालुका व शहर काँग्रेस कमेटी तर्फे उपोषण मंडपाला भेंट दिली व जहीर पाठिंबा देण्यात आला या वेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल शिंदे,शहराध्यक्ष झिया शेख, अल्प. जिल्हाउपाध्यक्ष अब्दुल वाहब,तहेसीन खान,रहेमान गौरी, डॉकटर मोहसीन, सय्यद जाणी ,माजी न. प. सदस्य अब्दुल समद, इस्राईल गुड्डू उपस्थित होते.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :-
1. मा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असूनही अनुसूचित जमातीची विशेष पदभरती अद्याप न झाल्याने, उर्वरित 12,520 पदांची भरती तात्काळ करण्यात यावी
2. शासकीय व निमशासकीय पदभरतीमध्ये अनुसूचित जमातीसाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात यावे.
3. शासन निर्णय 2019 नुसार, जात पडताळणी समितीकडे प्रलंबित असलेल्या सशक्त कंडिशनल व्हॅलिडिटी प्रकरणांची तात्काळ चौकशी करून अंतिम निर्णय घ्यावा.
4. अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त 85,000 पदांची पदभरती तातडीने सुरू करण्यात यावी.
5. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील 1,541 गट अ, ब, क, ड संवर्गातील पदे तात्काळ भरावीत.
6. सार्वजनिक बांधकाम विभागात अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या 109 जणांपैकी केवळ 80 पदे रिक्त दाखविण्यात आली आहेत, उर्वरित 29 पदे तात्काळ रिक्त घोषित करून भरावीत.
या मागण्यांसह विद्यार्थ्यांनी ठाम भूमिका घेतली असून, मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले.