पुसद तालुक्यातील वनवारला येथे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- तालुक्यातील वनवारला येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप लहुजी शक्ती सेना पुसदच्या वतीने करण्यात आले या आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे शहर महामंत्री नटवर उंटवाल यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष अंभोरे अध्यक्ष भीमशक्ती सामाजिक संघटना पुसद , खाडे सर , चंदन सर , राज डागर यांची विशेष उपस्थिती होती.
सर्वप्रथम लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले त्यानंतर शाळेत प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला शाळेतील सर्व कर्मचारी वर्गाचे उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री खंदारे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री वंजारे यांनी केले.
उपस्थित विद्यार्थ्यांना श्री नटवर यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती लहुजी शक्ती सेना पुसद यांनी घेतलेल्या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी लहुजी शक्ती सेनेचे भारत खंदारे व सर्व लहुजी शक्ती सेनेच्या परिश्रम घेतले हे विशेष….