न.प उर्दू शाळा क्रं २ मध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- येथील हाजी रफीक अहेमद लोहार नगरपरिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ येथे दिनांक २१ जुलै २०२५ रोजी विद्यार्थ्यांची वार्षिक आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरात सर्व प्रथम आयोजन शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक आरोग्य केंद्र, आणि शाळेतील शिक्षकवृंद खान सादिक सर, अब्दुल रब सर, वहिदा रेहमान बाजी, यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. शाळेत आलेल्या सर्व डॉक्टरांचा गुच्छ देऊन स्वागत करण्यात आला. या नंतर आरोग्य तपासणी
या उपक्रमात प्राथमिक तपासणी, दंत तपासणी, डोळ्यांची तपासणी, हिमोग्लोबिन व उंची- वजन मोजणी आदी तपासण्या करण्यात आल्या. डॉ. जिरोणकर, डॉ. झाडे व ANM मुजमुले शासकीय आरोग्य दवाखाना पुसद यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिरामध्ये इ. १ ली ते ७ वी पर्यंतच्या सुमारे विद्यार्थ्यांची ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
मुख्याध्यापक मोहम्मद शारिक सर यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांचे आरोग्य हेच शिक्षणात प्रगतीचे मुख्य साधन आहे.” पालकांनी आणि स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.