हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ मध्ये विद्यार्थ्यांचा विश्वास वाढला ; शाळेची पटसंख्या लक्षणीय वाढली…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांचे योगदान आणि पालकांचा विश्वास यामुळे येथील हाजी रफीक अहेमद लोहार नगरपरिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ लोहार लाईन पुसद या शाळेची पटसंख्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये लक्षणीयरीत्या वाढली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शाळेत ४६% ने वाढ झाली असून, नव्या प्रवेशांची संख्या वाढल्यामुळे शाळेचा परिसर उत्साहाने गजबजून गेला आहे. गतवर्षी [३६] विद्यार्थी होते, तर यंदा ही संख्या [५७] वर पोहोचली आहे.
मुख्याध्यापक मोहम्मद शारिक सर यांनी सांगितले की, “शाळेत नविन शैक्षणिक उपक्रम, डिजिटल शिक्षण पद्धती, गुणवत्तापूर्ण अध्यापन, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम यामुळे पालकांचा विश्वास वाढला आहे.” या साठी शाळेतील सहाय्यक शिक्षक खान सादिक सर ,वहीदा रहेमान बाजी (बालवाडी शिक्षिका) व अब्दुल रब सर स.शिक्षक या सर्वांचे लाख मोलाचे सहकार्य सोबत होते
शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच खेळ, व तालुका भाषण स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जीवन कौशल्यावर आधारित उपक्रमांद्वारे घडवले. या प्रयत्नांचे सकारात्मक फलित म्हणजेच वाढती पटसंख्या, असे स्थानिक नागरिकांचेही मत आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फारूक अहेमद तेली म्हणाले, “शाळेतील सकारात्मक वातावरण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाले.”
शालेय शिक्षणाचा नवा अध्याय सुरू…