पुसद येथिल अल-खैर फाउंडेशनच्या वतिने विद्यार्थीना शालेय साहित्याचे वाटप….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- येथिल अल-खैर फाउंडेशन मागील दहा वर्षा पासून गोर-गरीब निराधारांना निस्वार्थ भावाने मदत करत असते कोरोना काळात गरिबांना मोफत धान्य किट , मोफत मास , गरिबांना खिचडी वाटप , रक्त तपासणी शिबिर असे अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते तसेच स्वातंत्र्य दिनी विद्यार्थीना फळ वाटप याच बरोबर रुग्णाना मोफत औषधी वाटप मागील वर्षा पासून गरीब गरजू विद्यार्थ्यांना या फाउंडेशन कडून मोफत शालेय साहित्याचे मोफत वाटप सुरू करण्यात आले आहे. या फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते शहरातील शाळेत गरीब गरजू विद्यार्थ्यांना स्वतः जाऊन शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आला आहे.
त्यांचा या निस्वार्थ सामाजिक योगदाना बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
तसेच दि.20/07/2025 रोजी ग्रँड पलेज वाशीम रोड पुसद येथे मोफत कैंसर आजारावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन शिबिराला मुंबई येथिल डॉ. शेख अजीम कैंसर रोग तज्ञ , डॉ. नदीम शेख कैंसर रोग तज्ञ यांचे कैंसर आजारावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन होणार आहे. या कैंसर मार्गदर्शन शिबिराचे लाभ घेण्याचे आव्हान फाउंडेशन चे अध्यक्ष गुलाम अहेमद यांनी केले आहे.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहम्मद रेहान सचिव , मुशीर अहेमद उपाध्यक्ष , मिर्झा मलिक सहसचिव , सैय्यद उमेर कोषाध्यक्ष , सैय्यद एहशाम , सैय्यद सज्जाद , सोहेल अब्बास , अरबाज खान यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.