पवारांनी भाकरी फिरवलीच; शशिकांत शिंदेच पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “शशिकांत शिंदे यांच्या नावाची अखेर पवार गटाच्या नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे. खुद्द खासदार शरद पवार यांनीच शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली होती. परंतु, आपण प्रदेशाध्य पदाचा राजीनामा दिला नसल्याचे पाटलांनी काल सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जयंत पाटलांनी पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर शिंदे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील अशी घोषणा करण्यात आली.
हा शेवट नव्हे तर, नव्या पर्वाची सुरूवात
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देताना जयंत पाटील यांनी मी प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला होत असून, जे नवीन अध्यश्र असतील त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. हा शेवट नाही नव्या पर्वाची सुरूवात असल्याचेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच मी जातोय पण सोडत नाहीये असे सूचक विधानही जयंत पाटील यांनी केले आहे.
प्रदेशाध्य काळात जयंत पाटलांची कारकिर्द कशी?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची ७ वर्षांची कारकीर्द
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष
२०१८ साली पक्षाच्या प्रगतीच्या काळात अध्यक्ष शरद पवार यांच्या आग्रहाखातर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली
पदभार हाती घेताच सर्वात आधी महाराष्ट्राचा दौरा केला. राज्यभरात पक्षाची परिस्थिती काय आहे याची माहिती घेतली. विविध कार्यक्रम देऊन संघटनेला कार्यरत ठेवण्याचे काम या कालखंडात केले.
२०१८ च्या शेवटापर्यंत परिस्थिती प्रचंड बदलेली होती. अनेक जण पक्ष सोडून जात होते. २०१९ च्या तोंडावर लोकसभा निवडणुका लागल्या होत्या. या परिस्थितीत आम्ही हार मानली नाही. लढत राहिले, नवे लोक पक्षाशी जोडत राहिले.
डॉ. अमोल कोल्हे सारखे नेते पक्षात आणण्यात यश मिळाले
२०१९ लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ४ जागा निवडून आल्या. बारामती, सातारा, रायगड आणि शिरूर… हे अपयश पचवून पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागले…
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवस्वराज्य यात्रा – १ काढली, शिवनेरीला नतमस्तक होऊन काढलेल्या या यात्रेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत गेला.
पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती
पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला.. शिव स्वराज्य यात्रा स्थगित करून लोकांच्या मदतीला धावले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना निर्देश होते की जात पात धर्म पंथ पक्ष न पाहता प्रत्येकाच्या मदतीला धावा, परिस्थिती सावरण्याची जबाबदारी ही आपली आहे.
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश दिले…तब्बल ५४ जागा निवडून आल्या…
शरद पवार यांच्या किमयेने महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून पाच वर्षांनंतर पुन्हा सत्तेत परतले. महाविकास आघाडीत जलसंपदा मंत्री म्हणून काम केले.
सत्तेत आलो म्हणून शांत बसले नाही तर विविध उपक्रम राबविले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभिप्राय
२०२० साली राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय हा ऑनलाइन उपक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत कार्यकर्त्यांना थेट पवार साहेबांशी जोडून दिले. जवळपास ८ लाख कार्यकर्त्यांनी आपला अभिप्राय नोंदवला.
राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रा
२०२१ साली राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रा काढली. या यात्रेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक मतदारसंघात गेले. चांद्यापासून बांद्यापर्यंत गेले. भाषणे न करता तेथील पदाधिकाऱ्यांची चर्चा केली, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, पक्षाच्या परिस्थितीचा आढावा घेतला.
एक तास राष्ट्रवादी साठी
२०२२ साली परिवार संवाद यात्रेची सांगता सभा कोल्हापूरच्या तपोवन मैदानात पार पडली, त्या सभेला संकल्प सभा नाव देण्यात आले. या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंबर एकचा पक्ष बनवण्याचा संकल्प केला. त्यासाठी एक तास राष्ट्रवादीसाठी महापुरुषांच्या विचारांसाठी हा उपक्रम हाती घेतला..
शेतकरी आक्रोश मोर्चा
राज्यातील शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत होता. शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या विषयावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण ठिकठिकाणी शेतकरी आक्रोश मोर्चे काढले.
निष्ठावंत संवाद दौरा
२०२३ साली पक्ष फुटला. त्यावेळी पवारांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठावंत संवाद दौरा काढण्यात आला.
टू द पॉईंट
पक्षात जी फुट निर्माण झाली ती सांगण्यासाठी ‘टू द पॉईंट’ ही पॉडकास्ट सिरीज सुरू केली. डॉ. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शरद पवार यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आणि लोकांसमोर सत्य परिस्थिती मांडली.
लोकसभेत १० पैकी ८ जागा मिळवून घवघवीत यश मिळवले
स्वाभिमान सभा
लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रत्येक भागात स्वाभिमान सभा घेतली. बीड, येवला, जळगाव ठिकठिकाणी या सभा घेत पक्षाने महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवली.
‘विजय निश्चय दौरा’ आखला
या दौऱ्याच्या माध्यमातून कोणता लोकसभा मतदारसंघ आपण लढवला पाहिजे, उमेदवार कोण असू शकतो, आपले सैन्य खाली किती तयार आहेत? काय काय सुधारणा आमदारांनी व तेथील उमेदवारांनी केली पाहिजे याची चाचपणी केली आणि त्यानुसार व्युहरचना आखली.
विधानसभा निवडणुकीचा पराभव