रैनासुद्धा ! धोनीचा खास विश्वासू खेळाडूनेही माहीपाठोपाठ घेतला क्रिकेट संन्यास
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 15 ऑगस्ट : आणि विश्वासू खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनानेसुद्धा निवृत्ती जाहीर केली आहे. Instagram पोस्टमधून रैनाने मीसुद्धा तुझ्या प्रवासात तुला साथ द्यायचा निर्णय घेतला आहे, असं म्हणत रैनाने क्रिकेटला अलविदा केला आहे.
मधल्या फळीतला भरवशाचा फलंदात आणि संघाच्या गरजेनुसार ऑफस्पिन बॉलिंग करून यश मिळवणारा रैना एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता.
कर्णधार असताना धोनीने रैनाच्या या गुणांना हेरून त्याचा चांगला उपयोग करून घेतला होता. आता धोनीने निवृत्ती जाहीर केल्याच्याच दिवशी रैनानेही तीच वाट धरली आहे.
सुरेश रैना यानेसुद्धा भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला काही काळ गाजवला होता.
एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या काही खेळी लक्षात राहणाऱ्या आहेत. वन डे वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघात त्याचं स्थान लक्षात राहण्यासारखं होतं. त्याने त्या स्पर्धेत महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
आता धोनीबरोबरच रैनानेसुद्धा क्रिकेट संन्यास जाहीर केल्याने क्रिकेट चाहत्यांना आणखी हुरहूर लागली आहे.


सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….