महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन या तारखेपासून , मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 7 सप्टेंबरपासून बोलावण्यात येणार आहे. मुंबईत हे अधिवेशन पार पडणार आहे. याबाबतची शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना करण्यात येणार आहे.
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत 3 ऑगस्ट रोजी पावसाळी अधिवेशन घेण्याचं ठरलं होतं. मात्र कोवीड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आहे. तसंच राज्यातले आकडे देखील वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर अधिवेशन पुढे ढकलले गेले. आता हे अधिवेशन 7 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळतीये.
राज्यात कोरोनाच्या संसर्गाला सुरूवात झाल्यापासून मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती.
दररोज दीड हजार ते दोन हजार नव्या कोरोना रूग्णांची नोंद होत होती. त्यामुळे 3 तारखेला अधिवेशन घेणं उचित नव्हतं. आता मात्र मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या घटती आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अधिवेशन घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
दरम्यान, आता हा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यांची मंजुरी मिळाली की हे पावसाळी अधिवेशन ठरलेल्या तारखेला होईल.