बारामती स्वतंत्र जिल्हा निर्मितीची अफवा; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यात नव्याने जिल्ह्याची निर्मिती केली जाणार नसून, बारामती स्वतंत्र जिल्हा नसेल. तसा कोणताही प्रस्ताव नाही. या अफवा आहेत,’ असे स्पष्टीकरण जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बारामती येथे मंगळवारी केले.
राज्यात नव्याने काही जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार असून बारामती हा स्वतंत्र जिल्हा असेल, अशी चर्चा प्रसारमाध्यमातून होत आहे.
टेंभुर्णी येथील एका खासगी कार्यक्रमासाठी बारामती विमानतळावर आले असताना माजी महसूलमंत्री आणि विद्यमान जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्रकारांनी यासंदर्भात विचारणा केली. त्या वेळी त्यांनी ही अफवा असल्याचे सांगितले. पालकमंत्रिपदाची नियुक्ती, एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबतही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले,’पालकमंत्रिपदाबाबत कुठेही नाराजी नाही. महायुतीचा प्रपंच मोठा आहे. राज्याच्या निर्मितीनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच महायुतीला जनादेश प्राप्त झाला आहे. त्यामुळे सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत. यासंदर्भात महायुतीचे नेते एकत्र बसून मार्ग काढतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाहीत. गावी गेल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. ते नेहमीच गावी जातात. त्यामुळे ते नाराज असण्याचा प्रश्नच नाही.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….