छत्तीसगढमध्ये 14 माओवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाला मोठं यश…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
गरीयाबंद :- “छत्तीसगड ओडिशा सीमेवर गरीयाबंदमध्ये सुरक्षारक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 14हून अधिक माओवादी ठार झाले असून यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे . मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांच्या हवाल्याने सांगितले आहे .
छत्तीसगड ओडिशा सीमेवर गरियाबंद जिल्ह्यात झालेल्या या चकमकीत सुरक्षारक्षकांना मोठे यश आले आहे . या चकमकीत सीआरपीएफचा कमांडो बटालियनचा एक जवान जखमी झाला आहे. कोब्रा कमांडोला झालेली दुखापत किरकोळ असल्याचेही त्यांनी सांगितले . या चकमकीत एक कोटी रुपयांचे इनाम असलेला एक माओवादीही मारला गेला असल्याचे पोलिसांनी सांगितलंय .छत्तीसगडच्या कुलरीघाट राखीव जंगलात माओवाद्यांच्या उपस्थितीच्या गुप्त माहितीच्या आधारे 19 जानेवारीच्या रात्री ही कारवाई सुरू करण्यात आली होती.
माओवाद्यांच्या मृतांची संख्या वाढू शकते, असे अहवालात म्हटले आहे.याच ऑपरेशन दरम्यान झालेल्या चकमकीत दोन महिला माओवादी ठार आणि एक कोब्रा जवान जखमी झाल्याची माहिती आहे, छत्तीसगड-ओडिशा सीमेवर असलेल्या मैनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात सोमवारी रात्री उशिरा आणि मंगळवारी पहाटे गोळीबार झाला. यात अधिकाऱ्यांनी सांगितले की जिल्हा राखीव रक्षक, केंद्रीय राखीव पोलीस दल, छत्तीसगडमधील कोब्रा आणि ओडिशातील स्पेशल ग्रुप यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक या कारवाईत सहभागी होते.
नक्की झाले काय?
छत्तीसगड ओडिशा सीमेवर गरियाबंदमध्ये भीषण चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश 14हुन अधिक माओवादी ठार झाले आहेत. छत्तीसगडमधील गरिआबंद जिल्ह्यात छत्तीसगढ़-ओडिशा सीमेवर मैनपुर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या जंगलात सुरक्षा दलांसोबत नक्षलवाद्यांची चकमक झाली. या चकमकीत 14 हुन अधिक माओवादी ठार झाले असून यात 2 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. सीआरपीएफ कमांडो बटालियनचा एक जवान जखमी झाला आहे. कोब्रा कमांडोला झालेली दुखापत किरकोळ असल्याचे त्यांनी सांगितले. गारियाबंद डीआरजी ओरिसाच्या एसओजी आणि 207 कोब्रा बटालियन आणि सीआरपीएफच्या जवानांना यश मिळाले. Ccm Manoj आणि SZC गुड्डू मारल्या गेल्याची माहिती आहे. ओडिशाच्या नुआपाडा जिल्ह्याच्या सीमेपासून अवघ्या 5 किमी अंतरावर असलेल्या छत्तीसगडच्या कुलरीघाट राखीव जंगलात माओवाद्यांच्या उपस्थितीच्या गुप्त माहितीच्या आधारे 19 जानेवारीच्या रात्री ही कारवाई सुरू करण्यात आली होती.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….