अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचं कोडं उलगडलं, त्यावेळी काय काय घडलं? भुजबळांनी अखेर सांगितलं…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “अजित पवार यांनी घेतलेला पहाटेचा शपथविधी हा एक षडयंत्राचा भाग होता. शपथ घेऊ नका, असे मी दादांना सुचवले होते. एकप्रकारे त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा तो एक प्रयत्न होता, असे विधान मंत्री धनंजय मुंडे यांनी केले होते.
त्यांच्या याच विधानावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी गौप्यस्फोट केला.
छगन भुजबळ यांनी शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनात सहभाग नोंदवला असला तरी त्यांनी भाषण करणे टाळले. शिर्डीतून मुंबईत आल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बीड प्रकरण, वाल्मिक कराड प्रकरणाने सुरू असलेली पक्षाची बदनामी, पहाटेच्या शपथविधीवर त्यांनी भाष्य केले.
…त्या बैठकीतून शरद पवार निघून गेले होते!
भुजबळ म्हणाले, पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र भाजपने रचलं की आणखी कुणी रचलं, मला माहिती नाही. पण २०१९ सरकार स्थापनेआधी काही बैठका झाल्या होत्या. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे आणि शरद पवार यांच्यात वाद झाला होता. त्यांच्या वादानंतरच शरद पवार तेथून निघून गेले होते, असे भुजबळ यांनी सांगितले.
पहाटेच्या शपथविधीचं कोडं उलगडलं
उद्धव ठाकरे षडयंत्र रचू शकत नाही, काँग्रेस षडयंत्र रचू शकत नाही, मग षडयंत्र कुणी रचलं? राष्ट्रवादीतल्या लोकांनी की भाजपच्या लोकांनी षडयंत्र रचलं? असा प्रश्न आहे. मला एवढं नक्की आठवतं की शरद पवार आणि मल्लिकार्जून खरगे यांच्यात वाद झाला होता. त्या वादानंतर शरद पवार यांनी बैठक अर्ध्यावर सोडून निघून गेले होते. त्यानंतर राष्ट्रवादीतील प्रमुख मंडळींची बैठक एके ठिकाणी बोलावली गेली. त्या बैठकीला अजित पवार आलेले नव्हते. कामात असतील म्हणून ते आले नसतील, असे सांगितले गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी अजितदादांनी शपथ घेतली. मी तातडीने शरद पवार यांच्याकडे गेलो. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून आपण मजबुतीने उभे राहिले पाहिजे, असे सांगत अजितदादांचा प्रयत्न हाणून पाडू, असे सांगितले, असा किस्सा छगन भुजबळ यांनी सांगितला.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….