‘तटकरेंनी पाठीत खंजीर खुपसला’, गोगावलेंचं पालकमंत्रीपद हुकताच रायगडमध्ये तीव्र पडसाद….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “पालकमंत्रीपदाची घोषणा होताच महायुती सरकारमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गटात वादाला तोंड फुटलं आहे. रायगडचं पालकमंत्रीपद अजित पवार गटाच्या मंत्री आदिती तटकरे यांना दिल्याने शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले नाराज झाले आहेत.
पालकमंत्रीपद त्यांना न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीनं पालकमंत्रीपदाची घोषणा करताच रायगडमध्ये याचे पडसाद उमटले आहेत.
पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले यांना डावलून आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात आलं. त्यामुळे रायगडमधील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. त्यांनी मुंबई गोवा महामार्गावर महाडजवळ रात्री उशिरा रस्त्यावर टायर जाळून याचा निषेध केला. गोगावले यांचा जयजयकार करत त्यांनी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांचा निषेध केला. शिवसैनिकांनी जवळपास २ तास महामार्ग रोखून धरला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करीत शिवसैनिकांना बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. सुनील तटकरे यांनी गोगावले यांच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली. आजदेखील याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून डावल्यानंतर गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक आहे. रायगडचं पालकमंत्रीपद आम्हाला मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा होती, आमच्या सहापैकी सहा आमदारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याबाबत सांगितलं होतं. त्यानंतर जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यात भरत गोगावले हेच पालकमंत्री व्हावेत, असं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आता जो निर्णय घेण्यात आलाय, तो अनपेक्षित आहे. तो मनाला पटणारा नाहीये., आता आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य करावा लागेल”, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली आहे.
खरं तर, राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यापासून भरत गोगावले हे मंत्रीपद आणि पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मंत्रीपद मिळवण्यासाठी त्यांनी फिल्डींग लावली होती. मात्र शेवटपर्यंत त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा अनेकदा समोर आल्या. आता राज्यात नव्यानं महायुती सरकार आल्यानंतर गोगावले यांची मंत्री पदी वर्णी लागली आहे. मात्र पालकमंत्री पद आदिती तटकरे यांना मिळालं आहे. यामुळे गोगावले नाराज झाले आहेत. यामुळे आगामी काळात रायगडमधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….