पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 5 तरुणांना एसटी बसने चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- “एसटी महामंडळाच्या बसने पाच तरुणांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड-परळी रस्त्यावर असलेल्या घोडका राजुरी फाट्याजवळ हा अपघात घडला. अपघातात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दररोजप्रमाणे आजही पहाटे सर्वजण व्यायामासाठी रस्त्यावर गेले होते.
सविस्तर माहिती अशी की, पोलीस भरतीची तयारी करणारे 5 तरुण आज (19 जानेवारी) सकाळी बीड-परळी रस्त्यावर व्यायामासाठी गेले होते. यादरम्यान एका भरधाव एसटी बसने त्यांना चिरडले. या दुर्दैवी घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे.
पोलीस बनण्याचे स्वप्न भंगले
या घटनेत बालाजी मोरे, ओम घोडके, आणि विराज घोडके, अशी मृत तरुणांची नावे आहेत. तरुणांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….