मविआला आणखी एक धक्का; शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याच्या तयारीत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता आहे. शिवेसना ठाकरे गटाने मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या महापालिका निवडणुकी आम्हाला आमचे बळ एकदा आजमावून पाहयचे असल्याचे म्हटले आहे.
तर आता महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटकपक्ष शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत पक्ष मुंबई महापालिकेच्या किती जागा लढू शकतो यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई महापालिकेसंबंधी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. लवकरच मुंबई प्रांताची स्वतंत्र बैठक आयोजित करुन महापालिका निवडणुकीसाठी इच्छूकांच्या मुलाखतीही करण्याचा विचार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे देखील या बैठकीला उपस्थित होत्या. त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत मुंबई महापालिकेसंबंधी चर्चा केली. पक्ष मुंबई महापालिकेच्या किती जागा लढू शकतो यासंबंधी खासाद सुळे यांनी विचारणा केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पालिकेच्या 50 हून अधिक जागा लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
मुंबई महापालिका निवडणुकी लढण्याची पक्षाची तयारी आहे. त्यासाठी पक्षाच्या मुंबई प्रांताची बैठक लवकरच बोलावली जाईल, यामध्ये इच्छूकांसोबतही चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना ठाकरे गट आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी याबद्दलचे सुतोवाच केले होते. शिवसेना (ठाकरे ) एकदा मुंबईपासून नागपूर पर्यंत सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढू इच्छिते. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, अशी त्यामागील भूमिका राऊतांनी व्यक्त केली होती.
शिवसेना ठाकरे गटानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही स्वबळ आजमावण्याची तयारी दाखवली आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी अस्तित्वात राहील की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….