छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर? भुजबळांकडून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या पहिल्याच बैठकीत राष्ट्रवादीचे पहिले प्रदेशाध्यक्ष असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहिले नव्हते..
त्यामुळे उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. दोन महिने उलटूनही भुजबळांकडून ‘वेट अँड वॉच’चीच भूमिका घेतली जातेय. त्यातच आता प्रकृती अस्वास्थामुळे ते १८-१९ ला शिर्डीतील अधिवेशनालाही ते गैरहजर राहणार असल्याचं कळतंय.त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपवासी होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलायं.
पक्षाचे संस्थापक सदस्य असलेले भुजबळ यांना नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. याविषयीची उघड नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. यामुळे व्यथित झालेल्या भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. फडणवीस यांनी त्यांना काही काळ थांबण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यानंतरही भुजबळ यांच्याशी पक्षातर्फे संपर्क साधण्यात आला नाही. एवढचं काय पंतप्रधान मोदींच्या आमदारभेटीच्या बैठकीतही भुजबळ सहभागी झाले नव्हते. भुजबळ मुंबईत असूनही ते या कार्यक्रमांना अनुपस्थित राहिल्यानं भुजबळांबाबत चर्चा अधिक रंगू लागल्यात.
नाराज भुजबळ भाजपच्या वाटेवर?
छगन भुजबळ 2 महिन्यांनंतरही वेट अँड वॉचच्या भूमिकेत
भुजबळ राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत – सूत्र
भुजबळ राष्ट्रवादी सोडणार,भाजप भुजबळांना राज्यसभेवर घेणार?
येवल्यातून समीर भुजबळांना रिंगणात उतरवण्याची काका-पुतण्याची रणनिती
भुजबळांचं आतापर्यंतचे राजकारण पाहता ते फार काळ स्वस्थ राहतील किंवा ‘साईड ट्रॅक’ला जाण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळे राजकारणात मुरलेल्या आणि बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांच्या मुशीत तयार झालेले भुजबळ काय निर्णय घेतात हेच पाहायचं. मात्र भुजबळांमुळे कोणाचं बळ वाढणार आणि कोणाला फटका बसणार यावर राज्यातील ओबीसी राजकारण फिरणार एवढं नक्की.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….