म्हणून संतोष देशमुख यांची हत्या झाली ; SIT चा कोर्टात मोठा दावा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी झाली. यावेळी मोक्का लावण्यात आलेला आरोपी वाल्मिक कराड याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, सीआयडीनं कोर्टात मोठा दावा केला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असून ही हत्या का करण्यात आली? याचा दावाही एसआयटीनं कोर्टात केला.
एसआयटीनं कोर्टात नेमकं काय म्हटलं?
वाल्मिक कराडला सात दिवसांची जी पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कोठडी कोर्टात जे मुद्दे मांडले गेले त्यावरुन देण्यात आली. तर एसआयटीनं पहिल्यांदाच संतोष देशमुखांची हत्या का झाली? याचा मोठा दावा रिमांड रिपोर्टमध्ये केला आहे. एसआयटीनं म्हटलं की, आवादा कंपनीकडून वाल्मिक कराड यानं जी २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्या खंडणीला सरपंच संतोष देखमुख हे अडथळा ठरत होते.
तसंच कंपनीच्या बाजूनं बोलताना ते या सर्व आरोपींविरोधात भूमिकाही घेत होते. त्यामुळंच वाल्मिक कराडनं आपल्या साथीदारांच्या मदतीनं कट रचून संतोष देखमुख यांची हत्या केली, असा दावा एसआयटीनं कोर्टात केला.
तत्पूर्वी एसआयटीनं ९ ते १० मुद्दे कोर्टात मांडले होते. यांपैकी आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी शिवाजी थोपटे यांना सुद्धा थेटपणे वाल्मिक कराड यानं धमकी दिली होती. त्याला कार्यालयात बोलावून ही धमकी देण्यात आली होती, त्यांच्याकडं २ कोटी रुपयांची धमकी देण्यात आली होती.
तसंच वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या तिघांमध्ये हत्येच्या आधी आणि हत्येच्या नंतर या तिघांमध्ये फोनवरुन बोलणं झालं होतं. याचा सीडीआर रिपोर्ट अर्थात कॉल डिटेल रिपोर्ट कोर्टात सादर केला. या संपूर्ण रिपोर्टवर मोक्का कोर्टानं वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, वाल्मिक कराडच्या रिमांड रिपोर्टमध्ये एसआयटीनं हा सर्वात मोठा दावा केला आहे. त्यामुळं वाल्मिकवर लावलेल्या मोक्काच्या गुन्ह्यासाठी आणि वाल्मिकला शिक्षा होण्यासाठी आता हा सर्वात मोठा भक्कम पुरावा असल्याचही आता सांगितलं जात आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….