दिल्लीच्या रणांगणात काँग्रेसला मित्रांचा धक्का..! राहुल गांधी एकाकी ; मित्रपक्ष ‘आप’कडे…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेची निवडणूक काँग्रेस पूर्ण ताकदीने लढताना दिसत आहे. या निवडणुकीत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपाचे प्रमुख अखिलेश यादव, उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
हे तिन्ही पक्ष विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा भाग आहेत.
अरविंद केजरीवाल कसे देशविरोधी आहेत, हे पत्रकार परिषदेत सांगणार असल्याचे काँग्रेसचे अजय माकन यांनी सांगितले होते. मात्र, राहुल गांधींनी अजय माकन यांना फोन करून पत्रकार परिषद अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली होती. राहुल गांधी यांनी सहकारी पक्षांचे म्हणणे ऐकले. मात्र, त्यानंतरही ‘इंडिया’च्या सहकाऱ्यांनी काँग्रेसऐवजी ‘आप’ला दिल्ली निवडणुकीसाठी पाठिंबा दर्शविला, तर काँग्रेसचे म्हणणे आहे की, इंडिया आघाडीचे उद्दिष्ट २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे होते, जे पूर्ण झाले आहे.
केंद्रासोबत काम करू : फारूख अब्दुल्ला
ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार केंद्राशी लढणार नाही, तर जम्मू-काश्मीरमधील समस्या सोडवण्यासाठी त्यांच्यासोबत काम करेल, असे मत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी व्यक्त केले आहे.
‘इंडिया’मधील एकतेच्या चिंतेबद्दल ते म्हणाले की, ही आघाडी केवळ निवडणूक लढवण्यासाठी नाही, तर ती भारताला मजबूत करण्यासाठी आणि द्वेष दूर करण्यासाठी आहे. नॅशनल कॉन्फरन्सचा भाजपशी काहीही संबंध नाही. मात्र, स्थानिक समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारांना सहकार्य करण्याची जबाबदारी केंद्राची आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!