मंत्री महोदय , आपल्या पुसद विधानसभा मतदार संघात किती दिवस शासकीय कार्यालय भाडे तत्वावर ठेवणार…?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- पुसद विधान सभा मतदार संघाने राज्याला स्व.वसंतराव नाईक व स्व.सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने राज्याला दोन मुख्यमंत्री दिले , व त्याच बरोबर 15 वर्ष केबिनेट मंत्री दिलं , व त्या नंतर चौथ्या पिढीतील राजकीय वारसदार म्हणून आ. इंद्रनील नाईक यांना महत्वपूर्ण 6 मंत्री पद खात्याची जवाबदारी देण्यात आली त्या नंतर सुद्धा पुसद विधान सभा मतदार संघामध्ये राज्य उत्पादन शुल्क कार्यालय व दुय्यम निबंधक कार्यालय व अन्य काही शासकीय कार्यालय विधान सभा क्षेत्रात भाडे तत्वावर असल्याने नवनिर्वाचित मंत्री इंद्रनील नाईक यांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. त्या मुळे विद्यमान मंत्री इंद्रनील नाईक यांने सत्कार समारंभातून थोडा वेळ काढून भाडे तत्वावर सुरू असलेले कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी व त्या जागेवर ही भाडे तत्वावर असलेली कार्यालय उपलब्धीत जागे वर दर्जादार बांधकाम करून मतदार संघा समोर आदर्श निर्माण करावा अशी मागणी संपूर्ण पुसद विधानसभा मतदारसंघात जोर धरत आहे.
कारण इच्छाशक्ती च्या जोरावर तत्कालीन पालकमंत्री संजय राठोड व माजी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी त्यांच्या मतदार संघात भाडे तत्वावर चालणारी शासकीय कार्यालय शासनाच्या जागेवर उभारणी करून मतदार संघा सह राज्या समोर आदर्श निर्माण केला. यांच्या आदर्श घेवून विद्यमान मंत्री इंद्रनील नाईक यांनी पुसद विधानसभा क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये एकच छताखाली आणून भव्य-दिव्य प्रशासकीय इमारत उभी करून राज्यासमोर व मतदारसंघात आदर्श निर्माण करावं अशी मागणी जोर धरत आहे.