संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा अन् आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडेंनी मांडली भूमिका…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील तरुण सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कडक शासन व्हावे, त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी पहिल्या दिवशीपासून ठाम भूमिका होती आणि आजही तीच कायम आहे.
या प्रकरणी आरोपींना कोणाच्याही कितीही जवळचा असला तरी तातडीने शासन व्हावे यासाठी आणि न्यायालयीन दिरंगाई होऊ नये म्हणून फास्टट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालावे यासाठी बारा डिसेंबरला सर्वात आधी मुख्यमंत्र्यांकडे लेखी मागणी मी केलेली आहे, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी व्यक्त केले आहे.
तर स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा ही सर्वांचीच भूमिका आहे. मात्र या घटनेच्या आडून जे राजकारण केले जात आहे, ते दुर्दैवी आहे, तसे हे करू नये असे कळकळीचे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येची घडलेली घटना निर्घृण आणि तितकीच चीड आणणारी होती. यासारख्या घटना जिल्ह्यातच काय तर महाराष्ट्रात कुठेही होऊ नयेत यासाठी अशा गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढणे आवश्यक आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी योग्य ती पाऊले उचलली असल्याचे ते म्हणाले.
तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे आणि इतर तीन आरोपींचा शोध घेत आहे. या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….