महाराष्ट्रात ‘लाडकी बहिण योजना’ पुन्हा सुरू; महिलांना हप्त्याची कधी मिळणार भरपाई..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी महिलांना दरमहा १५०० ते ३००० असे टप्याटप्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे चालु होती.
पण विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे उपक्रम थांबवण्यात आली होती. मात्र आज पासून टप्प्याटप्प्याने सन्मान निधीला सुरुवात करत दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७,९२,२९२ भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
या योजनेअंतर्गत राज्य मंत्री अदिति तटकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्यांनी म्हटले की, या मदतीचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांच्या कुटुंबांना स्थिरता देणे आहे. यामुळे त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि जीवनात सकारात्मक बदल घडवतील, असा विश्वास आहे.
ही योजना का विशेष आहे?
आर्थिक आधार:
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य देण्यासाठी आधार.
सन्मानाचा भाव:
केवळ निधी देण्यापुरती ही योजना मर्यादित नसून महिलांच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देणारी आहे.
सशक्तीकरण:
महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न, जो त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यात मदत करतो.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….