‘अख्खा बीड जिल्हा नासवला, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा’, मस्साजोगच्या गावकऱ्यांची अजितदादांसमोर घोषणाबाजी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. आज १३ दिवसानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोग गावात जाऊन देशमुख यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.
यावेळी गावकऱ्यांनी अजितदादांना घेरलं. ‘अख्खा बीड जिल्हा नासवला, धनंजय मुंडेंला मंत्रिमंडळातून काढा’ अशी मागणीच गावकऱ्यांनी केली.
संतोष देशमुख यांचा आज तेराव्याचा दिवस होता. सकाळी शरद पवार यांची कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोग गावात जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन देऊन अजितदादा गावातून निघाले. यावेळी आपल्या ताफ्याकडे जात असताना मस्साजोगच्या गावकऱ्यांनी अजितदादांना घेरलं.
“धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका, ओ दादा, धनंजय मुंडेंला मंत्रिपद देऊ नका. त्याला कोणतंही पद देऊ नका. दादा, जनतेचं म्हणणं ऐकून घ्या, त्याच्या एकट्यामुळे सगळे मयत झाले आहे. हे सगळे कुत्रे आहे. धनंजय मुंडेंनी लय पक्षपात केला आहे, त्याने बीड जिल्हा नासवून टाकला आहे, त्या मंत्रिपद देऊ नका’ अशी पोटतिडकीने गावकऱ्यांनी अजितदादांकडे मागणी केली.
तसंच “अजितदादा काहीच बोलले नाही. साधं बोलले, सारवासारव केली आणि निघून गेले. गावातील लोकांची कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. संतोष देशमुख यांच्या हत्येला १३ दिवस झाले आहे. अजून ४ माणसं फरार आहे. पण अजूनही एकही माणूस पकडला नाही. आमचं काही ऐकून घ्यायचं नाही तर मग नागपूरमधूनच बोलायचं असतं. अजितदादांनी जे आश्वासन दिलं ते अजिबात मान्य नाही. वाल्मिक कराडला अटक करा, असं यायचं सांगून जायचं फक्त हे आम्हाला पटलं नाही’ असा रागही गावकऱ्यांनी व्यक्त केला.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….