संजय राठोड यांना पालकमंत्री पदासाठी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांचा विरोध….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
वाशीम :- “राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भ्रष्टाचार आणि महिला अत्याचाराच्या आरोपांनी वादग्रस्त ठरलेले संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिल्याने वाशिममधील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
आज पाटणी चौकात शेकडो शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून जोरदार अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
वाशिममधील शिवसैनिकांनी खासदार भावना गवळी यांना मंत्रिमंडळात संधी देण्याची जोरदार मागणी केली. महिला अत्याचार व भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकलेल्या संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री करू नये, अशी कार्यकर्त्यांची ठाम भूमिका आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्रिमंडळात महिलांना स्थान दिले, मात्र, शिवसेनेत एकाही महिलेला संधी न दिल्याचा कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
अशा नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन शिवसेनेचे नेमके काय उद्दिष्ट आहे? असा प्रश्न शिवसैनिकांनी यावेळी केला आहे. वाशिम शहरातील पाटणी चौकातील आंदोलनाची पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. असा इशारा शिवसैनिकांनी यावेळी दिला आहे.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….