युगेंद्र पवारांच्या पराभवावर शरद पवार अखेर बोलले, म्हणाले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- *राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री व महायुतीचे उमेदवार अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आणि पुतणे युगेंद्र पवार यांच्यावर मोठ्या फरकाने मात केली.
अजित पवार यांनी बारामती जिंकल्याने थेट शरद पवार यांच्याविरोधातील लढाई त्यांनी जिंकल्याचे आता बोलले जात आहे. युगेंद्रच्या पराभवानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार या लढतीवर बोलले आहे. युगेंद्र आणि अजित पवारांची तुलनी शक्य नाही, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, युगेंद्र लवकर राजकारणात आला. राज्यात काय मेसेज गेला असता आम्हाला माहिती होतं की दोघांची तुलना होऊ शकत नाही. युगेंद्र पवारांवर उतरवणं चुकीचे नव्हते. अजित पवार यांचे काम होते. असं आहे की, कोणता ना कोणता उमेदवार पराभूत करत असतो. त्या मतदारसंघात डायरेक्ट माझा संबंध आहे. उलट तिथे उमेदवार उभा केला नसता तर वेगळा मेसेज गेला होता. आम्हाला माहिती होतं दोघांची तुलना होऊ शकत नाही. अजित पवार यांचं सत्तेतलं स्थान हे एका बाजूला एक नवखा तरुण एका बाजूला आम्हाला त्याची कल्पना नव्हती.
मी घरी बसणार नाही, शरद पवारांनी ठणकावले
विधानसभा निवडणुकीतील पराभवावर बोलताना शरद पवार म्हणाले, अनेक धक्के बसले, हा धक्का किती मोठा आहे. निकाल का लागला, याचे उत्तर आम्ही शोधू. आज मी कऱ्हाडमध्ये आहे. एखादा घरी बसला असता. मी घरी बरसणार नाही. तरुण पिढीला असा अनुभव कधीच नव्हतो. पुन्हा एकदा नव्या जोमाने कर्तृत्ववान पिढी उभा केली पाहिजे, हा आमचा कार्यक्रम असेल.
पैशाच्या वाटपावर शरद पवार काय म्हणाले?
ईव्हीएमवर बोलताना शरद पवार म्हणाले, काही सहकाऱ्यांकडून मी मते ऐकली. परंतु अधिकृत माहिती माझ्याकडे नाही, तोपर्यंत मी बोलणार नाही. पैशाचा वाटप- यापूर्वी कधीही झालेले नव्हते, तेवढे वाटप यंदा झाले, असे लोक सांगतात. जरांगे मराठा राजकारण आम्ही ओबीसी एकवटले- याचीही अधिकृत माहिती माझ्याकडे नाही.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….