शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड ; मुख्यमंत्री कोण होणार..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- *शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये संपन्न झाली. या बैठकीमध्ये अनेक ठराव घेण्यात आलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आलेली आहे.
पक्षाच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करणारा ठराव शिवसेना नेते उदय सामंत यांनी मांडला होता. प्रताप सरनाईक यांनी या ठरावाला अनुमोदन दिलं. त्यामुळे विधीमंडळामध्ये एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदारांचं नेतृत्व करणार आहेत.
मुंबईतल्या ताज लँड हॉटेलमध्ये शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आलेली होती. या बैठकीला शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची उपस्थिती होती. बैठकीमध्ये इतरही काही ठराव घेण्यात आले, ते एकमताने मंजूर झाले.
विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने ८१ उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यापैकी ५७ उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा ७० टक्के इतका आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षांनी मिळून ४६ जागा जिंकल्या तर एकट्या शिंदेंनी ५७ जागा जिंकल्या आहेत.
कुणी किती जागा जिंकल्या?
महायुती- २३०
भाजप- १३२
शिवसेना- ५७
राष्ट्रवादी- ४१
महाविकास आघाडी- ४६
काँग्रेस- १६
शिवसेना (उबाठा)- २०
राष्ट्रवादी (श.प.)- १०
दरम्यान, राज्यामध्ये येत्या २७ किंवा २८ तारखेला नवीन सरकारचा शपथविधी होईल, असं सांगितलं जात आहे. राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, याबाबत अद्याप महायुतीने वाच्यता केलेली नाही. तिन्ही पक्ष मिळून याबाबत निर्णय घेतील, असं सांगितलं जात असलं तरी भाजपने ज्या प्रकारे मुसंडी मारली आहे, त्यावरुन त्यांचाच मुख्यमंत्री होईल, अशी शक्यता आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….