महागाव भाजपा तालुकाध्यक्षांमुळे उमरखेड विधानसभेत होणार भाजपा उमेदवाराची पीछेहाट ?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
वादग्रस्त महागाव भाजपा तालुका अध्यक्ष यांच्या विविध कारणाम्यांने तालुक्यातील जनता वैतागली आहे. विशेषतः मागील दहा वर्षापासून भाजपाचेच आमदार उमरखेड महागाव विधानसभेमध्ये होते परंतु विकास निधीमध्ये प्रचंड देणे घेणे झाल्याने या तालुक्यात भाजपा तालुका अध्यक्ष दीपकजी आडे यांच्या बद्दल मोठी नाराजी आहे. खरे तर मागील काही काळात हे भाजपा तालुका अध्यक्ष बाजार समितीचे सभापती होते हे सभापती होण्यापूर्वी बाजार समितीमध्ये दोन कोटी रुपयांच्या जवळपास फिक्स डिपॉझिट होते,परंतु यांच्या कार्यकाळात संपूर्ण बाजार समितीचे डिपॉझिट स्वाहा झाले तथा अनेक शेष घोटाळ्यांमुळे ततकालीन बाजार समीति सभापति हे मागील काळात तथा अद्यापही चर्चेत आहेत.
खरे तर याच तालुका अध्यक्षांच्या च्या परिवारातील व्यक्ति 2009 पूर्वी पासून मुडाणा सोसायटी चे अध्यक्ष आहेत. श्री मनमोहन सिंग पंतप्रधान असतांना या सोसायटीमध्ये बोगस कर्जवाटप झाले. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना आपण कर्ज घेतले हेही माहीत नव्हते. त्यांचा परस्पर सातबारा काढून कर्ज उचल केली असल्याचे तालुक्यात बोलल्या जाते. किती कर्ज घेतले व कोणत्या बँकेकडून घेतले शेतकऱ्यांना म्हणजेच सोसायटीच्या सभासदांना माहीतच नव्हते. बोगस कर्ज उचलून कोट्यावधी रुपयाची उचल केली व 2009 या साली मनमोहन सिंग सरकारमध्ये ते कर्ज माफ झाले, असे एक ना अनेक किस्से या तालुक्यात घडलेले आहेत. कधीकाळी कोणतीही परिस्थिती नसलेले व्यक्ती आज कोट्याधीश झाले आहेत. सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हेच तालुका अध्यक्ष मागील बऱ्याच काळापासून कार्यरत आहेत. यांच्या कार्यकाळात अनेक अनाधिकृत घटना घडल्या आहे असेही जनतेकडून बोलल्या जाते. तालुका अध्यक्ष पद निवडणूक होताना त्यामध्येही विद्यमान तालुका अध्यक्षांनी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार केल्या असल्याचे बोलल्या जाते. अशा व्यक्तीच्या भरोशावर जर भारतीय जनता पार्टी उमरखेड महागाव विधानसभा निवडणूक लढवीत असेल तर संबंधित उमेदवाराचे काहीच खरे नाही. महागाव तालुका भाजपा अध्यक्ष यांच्या बद्दल तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर आहे. खरे तर यांच्याच परिवारातील व्यक्ती महागाव नगरपंचायत मध्ये नगरसेवक आहेत. अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर नगरपंचायत अध्यक्ष च्या निवडणुकीमध्ये झालेल्या काँग्रेसच्या नगर पंचायत अध्यक्ष निवडीमध्ये लाखोच्या देवाण-घेवान मध्ये यांचाच मोठा हात असल्याचे तालुक्यात बोलल्या जाते. तालुक्यात भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीनजी भुतडा यांच्या कार्यप्रणालीमुळे तालुक्यातील सर्व मोठे व्यक्ती भाजपाचे काम करण्यास त्यांनी समर्थन दिले. खरे तर जिल्हास्तरावरील तथा उमरखेड स्तरावरील पक्षश्रेष्ठी हे कितीही मन लावून गावात ग्रामपंचायत मध्ये गोरगरिबांचे कामे करण्यासाठी तत्पर असली तरी तालुका अध्यक्षांनी मात्र विकास निधीवर मोठ्या प्रमाणात डल्ला मारल्याचे बोलल्या जाते.
विद्यमान आमदार नामदेव ससाने यांचे पक्षसृष्टीने तिकीट कापले यामागेही याच तालुका अध्यक्षांचा मोठा हात आहे. त्याबाबत कारण अशे की तालुक्यात दिल्या जाणारा आमदार फंड याच महाशयांच्या माध्यमातून दिल्या जात होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्सेंटेज हा विषय तालुक्यात बोलल्या जातो ,त्यामुळे या तालुक्यात नामदेव ससाने बद्दल मोठी नाराजी निर्माण झाली होती. याचाच परिणाम म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा निवडणुकी मधील सर्वे मध्ये ससाने यांच्याबाबत नाराजी दिसली. त्यामुळे विद्यमान आमदार नामदेव जी ससाने यांचे तिकीट कापल्या गेले आता जरी नवख्या उमेदवाराला भाजपाने तिकीट दिले असले तरी तालुका अध्यक्ष वरील असलेल्या नाराजी मुळे या तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसेल यात काही शंका नाही असे तालुक्यातील जनतेंकडून बोलल्या जाते. खरे तर मागील पाच वर्षांमध्ये पक्षश्रेष्ठींनी याकडे लक्ष घालने गरजेचे होते. मागील दहा वर्षापासून उमरखेड महागाव विधानसभा भाजपाचा बाले किल्ला होता येणाऱ्या काळात भाजपाचा बुरुज ढासळेल की साबूत राहील हे सांगणे अवघड झालेले आहे.
विधानसभेतील निवडणूक काळात या अध्यक्षांपासून भाजपाच्या उमेदवाराने किंवा पक्षसृष्टीने दूर राहिल्यास भाजपाचे भले होऊ शकते अशी चर्चा तालुक्यात ऐकावयास मिळत आहे…