मंगरुळपिर तहसील कार्यालयाचा “हम करे सो कायदा”! अल्पभूधारक बळीराजाला वर्षांपासून नाहक त्रास
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मंगरुळपिर(वाशिम)
तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या गलथानपणाचा नाहक त्रास एका वयोवृद्ध 65 वर्षाच्या शेतकऱ्यांला भोगावा लागत असल्याची तक्रार अखिल भारतीय तांडा सुधार समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कार्यालयाला व देशाच्या प्रधानमंत्री कार्यालयाला केली आहे.
सविस्तर वृत्त असे की,
बाबाराव शामराव गुठे, मु. चोरद, शेलू खुर्द (अल्पभूधारक शेतकरी ) खाते क्र. 0810922010002464
IFSC;ADCC0000081)
यांचा प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा निधी तहसील कार्यालयाच्या हम करे सो कायदा मुळे प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा निधी दुसऱ्या खातेदाराच्या खात्यात जमा केला . या योजनेसाठी बाबाराव शामराव गुठे यांनी पूरविलेल्या कागदपत्रांची काळजीपूर्वक नोंद न करता त्यांच्या बँक खाते क्रमांकामध्ये तहसील कार्यालयाकडून चूक करण्यात आली. त्यामुळे शासनाकडून आलेला हा निधी त्यांच्या बँक खात्यात जमा न होता इतर व्यक्तीच्या खात्यात जमा झाले. यात बाबुराव गुठे यांची कुठेही चूक नाही.याविरुद्ध बाबुराव गुठे यांनी तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम यांच्याकडे वेळोवेळी दाद मागितली. पण सिनियर सिटीझनचा सन्मान राखणाऱ्या महाराष्ट्राच्या या नोकरशाहीने दाद दिली नाही. पर्यायाने गुठे यांनी तांडा सुधार समितीकडे न्याय मिळवून देण्याची विनंती केली. तहसील कार्यालयाने आपल्या वरील जबाबदारी झटकून एका वर्षांपासून हया गरीब होतकरू व वयोवृद्ध नागरिकांला नाहक त्रास देत असल्याचे तांडा सुधार समितीच्या निदर्शनास आले आहे.
त्यामुळे तांडा सुधार समितीचे मुख्य संयोजक व महासचिव नामा बंजारा यांनी या घटनेची दखल घेत तहसील कार्यालयाने त्यांच्या नावाने आलेला हा निधी वीस दिवसाच्या आत सन्मानाने त्यांच्या खात्यात जमा करून त्यांना तसे न कलविल्यास तहसील कार्यालयाचा घेराव करण्यात येईल व याची सर्व जबाबदारी तहसील कार्यालयाची असेल असा इशारा दिला आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…