वर्षा बंगल्यावर जितेंद्र आव्हाड अन् मुख्यमंत्र्यांसोबत खलबत्त..! भेटीचं कारण आलं समोर…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आजपासून मोठ्या उत्साहात गणपती उत्सावाला सुरूवात झाली आहे. राज्यातील विविध राजकारणी नेत्यांच्याही घरी गणपती बाप्पाच आगमन झालं आहे. अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा केली.
त्यानंतर आरती करून दर्शन घेतले. अशातच वर्षा बंगल्यावरील गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना मोठं भाष्यं केले आहे.
गणपती उत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे गणपती समोर आम्ही राजकारण केले नाही. हल्ली त्यांची भेट होत नाही, तसा त्यांनाही वेळ मिळत नाही. त्यामुळे यानिमित्ताने तरी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. त्यामुळे याठिकाणी कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. फक्त गणपती बाप्पाचं दर्शन घेतले. अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळे यांच्यावर टिका केली जात आहे. त्यावर देखील त्यांनी भाष्य केले. सुप्रिया ताईं असं वक्तव्य करणार नाहीत. ताईंनी कधीही अशी भाषा वापरलेली नाही. आमचं त्यांच्याशी फक्त वैचारिक मतभेद आहेत. असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.