मालाडमध्ये मोठी दुर्घटना..! २३ मजली इमारतीचा स्लॅब कोसळून ३ ठार, ३ जखमी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबई मालाड येथे बांधकाम सुरू असलेल्या २३ मजली इमारतीच्या २० व्या मजल्याच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याने ३ मजूर ठार झाले आणि ३ जखमी झाले आहेत. ही दुर्घटना गुरूवारी (दि.५ सप्टें) घडल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस पोहोचल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मालाडमधील तळमजला अधिक २३ मजली इमारतीच्या २० मजल्याच्या स्लॅबचा काही भाग बांधकाम सुरू असताना कोसळला. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. यामधील जखमी मजुरांना जवळच्या एमडब्ल्यू देसाई रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केल्याचे बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले.