शरद पवारांच्या नावावरच निवडणूक लढवणार, बड्या नेत्याने केले कॉंग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या बातम्यांचे खंडन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात पुण्यातील पवारांचं निवासस्थान मोदी बागेत बैठक बोलावण्यात आली आहे.
या बैठकीला शरद पवार गटाचे काही आमदार आणि खासदार देखील उपस्थित असणार आहेत. माध्यामांमध्ये अशा शक्यतांच्या बातम्या येत असतानाच शरद पवार गटाचे नेते आणि पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, ‘बाकी चर्चांना काही अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला आमचं चिन्ह आणि पक्ष द्यावे’, असंही त्यांनी म्हटलं आहे.
आमदार, विद्यमान खासदार, मंत्री आजी-माजी खासदार यांची बैठक शरद पवारांनी आज घेतली होती. या बैठकीत त्यांनी पक्ष चिन्ह आणि नाव यासंदर्भातील केस सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, त्याविषयी चर्चा केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत लवकर निर्णय द्यावा अशी आमची मागणी आहे. शरद पवारांचे नेतृत्व राज्याला मान्य आहे, आणि त्याच्यांच नेतृत्वाखाली निवडणुका लढणार असल्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असंही प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.