महाराष्ट्रातील ५० वाघ इतरत्र हलवणार, मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनखात्याकडून लवकरच निर्णय वनमंत्री संजय राठोड
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महाराष्ट्रातील ५० वाघ राज्यात इतरत्र हलवण्यात येनार आहेत. मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी याबाबतचा निर्णय वनखाते घेण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.
राज्यात कोरोना विषाणूचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या या महामारीनंतर वनमंत्री संजय राठोड यांनी अधिकाऱ्यांना वाघांबाबतचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. राज्यात वाघांची संख्या वाढली आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील ५० वाघ इतरत्र हलवण्यात येणार आहे. लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी वनखात्याकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात १६० वाघ आहेत. तर चंद्रपूर शहराच्या हद्दीत १२ वाघ आहेत. येत्या काळातील धोका टाळण्यासाठी वाघांना राज्यात हलवण्यात येणार आहे. लवकरच यासंदर्भात कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…