रुग्णालयांत मृत्यूसत्र पण मुख्यमंत्री कुठेही नाहीत, जबाबदारी ढकलू नका :- आदित्य ठाकरे….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- नांदेड, औरंगाबाद, नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील परिस्थितीसमोर आल्यानंतरही मुख्यमंत्री कुठेही दिसले नाहीत. आरोग्यमंत्री तर म्हणाले, ही आमची जबाबदारी नाही,पूर्ण मंत्रिमंडळाची आहे.
राजीनामा देणार नाही, कारण हिंम्मत नाही, पण जबाबदारी ढकलू तरी नका, असे असे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) ते आले. घाटीतील रुग्ण संख्या, औषधांची मागणी,उपलब्ध साठा, रुग्णांकरिता सुविधा व रिक्त पदे याबाबत त्यांनी अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे , किशनचंद तनवाणी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय कल्याणकर , डॉ. अरविंद गायकवाड आदी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, मृत्यूमागील कारणे शोधली पाहिजे. राजकीय वर्ग म्हणून आम्ही डीन सोबत आहोत. नांदेड येथे राजकारणासाठी खासदारांनी केलेला स्टंट दुर्दैवी आहे

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….