“फडणवीसांनी राणांना आवर घालण्याची गरज आहे”, बच्चू कडूंच्या वक्तव्यावर रवी राणा प्रत्युत्तर देत म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभय असल्यामुळे राणा दाम्पत्य काहीही वक्तव्य करतात. राणांना फडणवीसांनी आवर घातली पाहिजे, असं प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं होतं.
याला आमदार रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सरकारला ब्लॅकमेल करून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आवर घालण्याची गरज आहे, अशी टीका रवी राणांनी बच्चू कडूंवर केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
रवी राणा म्हणाले, “मी देवेंद्र फडणवीसांबरोबर ११-१२ वर्षापासून आहे. सुख आणि दु:खात एकत्र राहणारे व्यक्ती आम्ही आहोत. पळ काढणारे नाहीत. बच्चू कडू कधी इकडे कधी तिकडे असतात. त्यांनी सल्ला देण्याचं काम करू नये.”
“मला पाडण्यासाठी सर्व नेते निवडणुकीत एकत्र येतात. पण, जनता नेहमी माझ्याबरोबर असते. बच्चू कडूंना आवर घालण्याची गरज आहे. सरकारला ब्लॅकमेल करून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आवर घालण्याची गरज आहे. आम्ही कधी मंत्रीपद, तिकीट किंवा कोणतं पद मागितलं नाही,” असं रवी राणांनी म्हटलं.
“देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर राहून जिल्ह्याचा विकास करण्याचा संकल्प घेऊन मी काम करतोय,” असं रवी राणांनी सांगितलं.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….