भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे ; नाना पटोलेंचा घणाघात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीकास्र सोडलं आहे. तर मराठवाड्यात होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीवर देखील त्यांनी टीका केलीये.
यावर बोलतांना त्यांना म्हटलं की, ‘फाईव्ह स्टारचं कल्चर हे भाजपचं आहे. मराठवाड्याचं त्यांनी पानं उलटून पाहावं. आतापर्यंत औरंगाबादमध्ये जी मंत्रीमंडळाची बैठक झाली ती रेस्ट हाऊस किंवा कमिश्नर ऑफिसमध्ये झाली. पण यांची ही बैठक फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होणार आहे. तुम्ही दहा वर्ष सत्तेत आहात. केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता आहे, त्यामुळे तुम्ही काय केलं याचा हिशोब आधी द्या. काँग्रेसनं काय केलं हे राज्यातील जनतेला माहित असून तुमची अवस्था फार वाईट आहे.’
‘मौजमजा करण्यासाठी औरंगाबादला जातायत’
सरकार मौजमजा औरंगाबादला जाणार असून त्यांना त्यांची ही मौजमजा भारी पडणार असल्याचं यावेळी नाना पटोले यांनी म्हटलंय. तर कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यावर देखील नाना पटोले यांनी भाष्य केलं. यावेळी बोलतांना त्यांनी म्हटलं की, ‘आउट सोर्सिंगच्या माध्यमातून शासकीय पदे भरली जाणार आहेत. खरंतर जनेतेची सेवा करण्याचं काम हे सरकारचं असतं. पण अशा प्रकारे कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करुन जनतेची लूट करण्याचा प्रयत्न भाजपचं सरकार करत असून आम्ही त्याचा निषेध करत आहोत. तर हे मराठवाड्याला काही देणार नाही, फक्त बोलायचं म्हणून बोलतील. आज महाराष्ट्रासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि ते सोडवणं जास्त गरजेचं आहे.’
काँग्रेसवर कितीही आरोप केले तरी… – पटोले
‘आणखी किती वर्ष तुम्ही काँग्रेसवर आरोप करणार आहात. आता महाराष्ट्राच्या जनतेला खरं काय ते कळालं आहे. तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे देखील जनतेला समजलंय. त्यामुळे आता काँग्रेसवर आरोप करुन काहीही होणार नाही’, असं देखील नाना पटोले यांनी म्हटलंय. यावेळी नाना पटोले यांनी मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर देखील निशाणा साधला. भाजपच्या मंत्र्यांकडून जनतेच्या पैशांची लूट करत असल्याचा दावा नाना पटोले यांनी केलाय. तर भाजपमध्ये अनेक स्वार्थी माणंस असल्याचं म्हणत नाना पटोले यांनी विजकुमार गावित यांच्यावर निशाणा साधलाय.
राज्यमंत्रीमंडळाची बैठक ही येत्या 16 सप्टेंबर रोजी औरंगाबादमध्ये होणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण मंत्रीमंडळ हे औरंगाबादमध्ये जाणार आहे. सोबतच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी देखील शहरात राहणार आहे. तर, मंत्री मंडळाची बैठक होत असल्याने मोठ्या प्रमाणात आंदोलने होण्याची शक्यता आहे.

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….