प्रसिद्ध अभिनेत्री व माजी खासदार जया प्रदा यांना सहा महिन्यांची शिक्षा अन् पाच हजाराचा दंड ; नेमकं प्रकरण काय…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- चेन्नई न्यायलयाने प्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना ६ महीने तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. चेन्नईच्या रायपेटा विभागातील जया प्रदा यांच्या मालिकेच्या चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
याबरोबरच त्यांना ५००० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
या चित्रपटगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इएसआयचे पैसे दिले नसल्याने त्यांनी चित्रपटगृहाच्या मॅनेजमेंटविरोधात न्यायलयात धाव घेतली आहे. कोर्टात प्रकरण गेल्यावर थकलेली रक्कम परत देण्याचे आश्वासनही अभिनेत्री जया प्रदा यांनी दिले. इतकंच नव्हे तर हा खटला रद्द करण्याची विनंतीसुद्धा जया प्रदा यांनी केली.
कामगार सरकारी विमा मंडळाने नेमलेल्या वकिलांनी मात्र यावर आक्षेप घेतला. त्यानंतर या प्रकरणात आता जया प्रदा यांच्यासह आणखी तीन लोकांनाही सहा महिन्यांची शिक्षा आणि ५००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाची आणखी कसून चौकशी करत आहेत.
जया प्रदा यांनी तब्बल दोन वेळा रामपुरचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१९ मध्ये भाजपाने जया प्रदा यांना रामपूरमधून उभं राहण्यासाठी तिकीट दिलं पण त्यांचा पराभव झाला. मनोरंजन क्षेत्राबरोबर जया प्रदा यांनी राजकारणातही स्वतःचा ठसा उमटवला आहे. अद्याप न्यायालयाच्या निर्णयावर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….