भर चौकात सहा जणांनी केली एका इसमाची हत्या, चार आरोपी अटक तर दोन फरार
- मुळदाडा गावात तणावाचे वातावरण
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया
राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी /गोंदिया
गोंदिया :- लाकडांच्या पैश्यांना घेऊन सुरू असलेल्या वादात होळीच्या दिवशी सहा जणांनी एका वैक्तीला काठीने मारहाण केली होती. नागपूर येथे उपचार दरम्यान त्या इसमाचा मृत्यू झाला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या दवणीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम मूळदाडा या गावात आज तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत्यूकाचे नाव रामरतन गेंदलाल रहेकवार वय 40 वर्ष रा. मुळदाडा असे आहे.
मृतक रामरतन ने वर्षभरापूर्वी सावराटोली येथील मोहपत नागपुरे याच्या कडून दोन हजार रुपयांची लाकडे खरेदी केली होती. मात्र रामरतन लाकडाचे पैसे मागत होता मात्र मृतक पैसे देण्यास टाळा टाळ करत असल्याने मोहपत नागपुरे यांनी मंगळवारी सायंकाळी शालीक बानेवर यांच्या दुकानासमोर रामरतन याला. त्याच्या आई, पत्नी व मुलगी, बहीण घटनास्थळी असल्याने आरोपी ने घटना स्थळवरून पसार झाले. या बाबत पोलिसांत तक्रार दिली असता पोलिसांनी जखमी झालेल्या रामरतनला दवणीवाडा आरोग्य केंद्रातून उपचारासाठी भर्ती करण्यात आले मात्र गंभरी जखमी असल्याने त्याला गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. मात्र जास्त मार असल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आले होते. मात्र रामरतन याचा दि.12 मार्च गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला आहे. त्यामुळे मूळदाडा या गावी तणावाचा वातावरण निर्माण झालेला आहे.
आरोपी मोहपत नागपुरे हा घटनेच्या दिवशी सहा जणांना घेऊन मृतकाच्या घरी आला होता. त्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्या आधारे पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली असून दोन आरोपी फरार असून आरोपींचा शोध सुरू असुन पुढील तपास दवणीवाडा पोलीस करीत आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….