संजीवनी हिने घेतली वकृत्व कलेत गगनभरारी
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया
अर्जुनी-मोर / संतोष रोकडे
गोंदिया:- गोंदिया जिल्ह्यातील शेवटचा टोकावरील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी पिंपळगाव येथील कुमारी संजीवनी कृष्णकांत खोटेले वय 15 वर्ष वय हिने वकृत्व उंच भरारी घेतली आहे ती सरस्वती विद्यालया अर्जूनी मोर येथे इयत्ता दहावी ला शिक्षण घेत आहे तर, वडील कृष्णकांत शेती करतात तर आई केशर गृहिणी म्हणून काम करते वयाच्या अगदी कमी वयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार महिलांसाठी जनजागृती तसेच अंधश्रद्धा निर्मूलन महिला सशक्तिकरण व इतर विषयांवर प्रबोधन करणे सोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान व समाज प्रबोधन करून संपूर्ण विदर्भात नाव लौकिक मिळविला आहे.
संजीवनी ने आपल्या वक्तृत्वाला सुरुवात वयाच्या अकराव्या वर्षापासून केली असून, तिच्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज मोझरी यांच्या विचारांचा पगडा आहे. त्यांनी आपल्या वकृत्व केलेला राष्ट्रसंताच्या कर्मभूमी मोझरी येथूनच सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात सर्वत्र गाजत असलेले प्रशांत ठाकरे महाराज कीर्तनकार सत्यपाल महाराज, तुषार सूर्यवंशी महाराज यांच्या व्यासपीठावरुन आपल्या गोड वाणीने श्रोत्यांची मने जिंकली आहेत. विद्यमान विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सोबतीला सौंदड जवळील श्रीराम नगर येथे सुद्धा व्याख्याती म्हणून बोलताना श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. आतापर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यात व्याख्यानातून समाजप्रबोधन करून आपले पाय वक्तृत्वात रोवले आहेत विशेष म्हणजे गुरुकुंज मोझरी यांच्या वतीने होणाऱ्या अनेक ठिकाणी बालसंस्कार शिबिरात सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्य करीत आहे. हे सर्व करूनही अभ्यासात सुद्धा चांगली प्रगती आहे तिने सकाळ शी बोलताना आपल्या या यशाचे श्रेय आचार्य हरिभाऊ वेरुळकर, पुरुषोत्तम खेडेकर साहेब, प्रशांत दादा ठाकरे, महाराज तुषार दादा उमाळे, गणेश बोदडे अर्जुनी-मोर येथील सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य अनिल मंत्री वडील कृष्णकांत व आई केशर यांना दिली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….