वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुसद येथे वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीदिनी सविधान या राष्ट्रीय ग्रंथाचे वाटप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार ॲड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती पक्षाच्या वतीने साजरी करण्याचे आदेश समस्त कार्यकर्ता पदाधिकारी यांना दिले होते.
दिलेल्या आदेशाचे पालन करून वंचित बहुजन आघाडी पुसद तालुक्याच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त नाविन्यपूर्ण विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते 14 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8 वाजता वंचित बहुजन आघाडी पुसद तालुका अध्यक्ष बुद्ध रत्न भालेराव व शहराध्यक्ष जयानंद उबाळे यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
तसेच दुपारी 4 वाजता वंचित बहुजन आघाडी शहर कार्यालय तुकाराम बापू वार्ड पुसद येथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैल चित्राची भव्य मिरवणूक शहरातील मुख्य मार्गातून काढण्यात आली. पक्षाच्यावतीने काढलेल्या मिरवणुकीमध्ये डीजेवर वाजत असलेले वंचित बहुजन आघाडीचे “””आली वंचित वंचित ,वंचित बहुजन आघाडी ”’या गीताने शहरातील जनतेचे लक्ष वेधून घेतले छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जयंती दिनी
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अपार कष्टाने भारतीय संविधानाची निर्मिती करून बहुमूल्य असे भारतीय संविधान भारत देशाला बहाल केले.
आज भारत देश जो अखंड भारत प्रगतीपथावर आहे. परंतु आज देशातील केंद्र सरकार जाणीवपूर्वक भारतीय संविधानाची विटंबना करण्याचे काम नवी दिल्लीमध्ये होत आहे भारतीय संविधानाच्या प्रती जाळण्यात आल्या त्यामुळेच भारतीय संविधानाच्या ग्रंथाचे जतन करणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.
त्यामुळेच पुसद तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नाविन्यपूर्ण अशा सामाजिक उपक्रमांतर्गत
भारतीय संविधान ग्रंथाच्या 200 प्रतीचे वाटप विविध जयंती उत्सव मंडळासह विविध स्तरातील मान्यवर तथा सामाजिक कार्यकर्ते महिला यांना वाटप करण्यात आल्या.
या विविध पूर्ण सामाजिक उपक्रमाची पुसद येथे उल्लेखनीय प्रशंशा होताना दिसत आहे.
या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता दिशा पिंकी शेख यांनी पुसद येथील कार्यालयास भेट दिल्याने तृतीयपंथी समाज वंचित बहुजन आघाडीकडे वळला असून याही समाजाचे अनेक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रकर्षाने सहभाग घेऊन आपला सहभाग नोंदवीत आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून वसंत नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण नाचणकर ,जिल्हा महासचिव डी.के दामोधर ,भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, जिल्हा संघटक विजय लहाने, प्रज्ञापर्व माजी अध्यक्ष विठ्ठल खडसे सर, डॉक्टर राहुल भगत,वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, शहराध्यक्ष जयानंद उबाळे, रिपब्लिकन वार्ता चे विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, तालुका उपाध्यक्ष कृष्णा दोडके, तालुका महासचिव सतीश भरकाडे, तालुका उपाध्यक्ष दीपक पद्मे, तालुका सहसचिव सचिन सूर्यवंशी, शहर महासचिव डॉ.अरुण राऊत, शहर संघटक मधुकर सोनवणे, शहर उपाध्यक्ष शेख कलिम, विनायक मडके, मनीष पलीकोंडावार, शंकर करमणकर ,नागेश गायकवाड, गौतम जाधव ,अजय जाधव, प्रीतम आळणे, गजानन थोरात, संतोष चव्हाण, आकाश पाईकराव, वासुदेव मांडवगडे, इम्रान खतीब ,अफजल खान, राहुल वाढवे ,विशाल जाधव, विशाल कांबळे , तृतीयपंथी शेख कलीम, संतोष चव्हाण
इत्यादी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.