पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीर ; मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपये….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला.
या खासगी बसमध्ये 40 ते 45 प्रवासी होते. हे सगळे प्रवासी झांज वादक आणि कलाकर होते. या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे आणि अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.