“माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे; मी माफी मागणार नाही”, राहुल गांधींचं भाजपाला प्रत्युत्तर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसकडून मोदी सरकावर जोरदार टीकास्र सोडण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी अदाणी आणि मोदींच्या संबंधाच्या मुद्दा उपस्थित केल्यानेच ही कारवाई करण्यात आली, असा आरोप कांग्रेसकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, भाजपानेही या मुद्द्यावरून काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं असून राहुल गांधी यांनी माफी मागितली असती, तर ही वेळ आली नसती, असं ते म्हणाले. दरम्यान, यसंदर्भात आज राहुल गांधी यांनी विचारलं असता, त्यांनी सावरकरांचं नाव घेत भाजपावर निशाणा साधला.
खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आज पाहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं. तसेच अदाणी आणि मोदींच्या संबंधावर प्रश्न विचारल्यानेच माझ्याविरोधात कारवाई करण्यात आली, असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.
यावेळी, मोदी आडनावासंदर्भात केलेल्या विधानावर त्यांनी माफी का मागितली नाही, असे विचारलं असता, माझं नाव सावरकर नाही, तर गांधी आहे आणि गांधी कोणाचीही माफी मागत नाही, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी मोदी सरकावर निशाणा साधला. तसेच
देशातील लोकशाही संपली असून या देशातील संस्थांवर आक्रमण होत आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी मोदींना चोर म्हणून ओबीसींचा अपमान केला, असा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. या आरोपांनाही राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं. मी भारत जोडो यात्रेदरम्यान सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चाललो. माझ्या यात्रेत सर्वच समाजाचे लोक सहभागी झाले होते. मुळात हा ओबीसीचा विषयच नाही. हा अदाणी आणि मोदींच्या संबंधाचा विषय आहे. ओबीसींना पुढे करत भाजपा मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यांनी कितीही आरोप केले, तरी मी त्यांना प्रश्न विचारणं बंद करणार नाही, असेही ते म्हणाले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….