कृषी सहाय्यकांची रिक्त पदे भरण्यासाठी पंधरा दिवसात जाहिरात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे भरण्यासाठी पंधरा दिवसात जाहिरात काढली जाईल. तसेच कृषी सहाय्यकाच्या पदनामात बदल करून ते सहाय्यक कृषी अधिकारी करण्यासाठी १५ दिवसात संबंधिताची बैठक घेऊन यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी विधान परिषदेत सांगितले.
राज्यातील कृषी सहाय्यकांच्या रिक्त असलेल्या पदासंदर्भात (Marathwada) मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. (Maharashtra Budget) राज्यात कृषी सहाय्यकांची २११५ पदे रिक्त आहेत. कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचा शेतकर्यांमध्ये प्रचार व प्रसार करण्याचे मुख्य काम तसेच कृषी क्षेत्रातील ४० ते ५० योजनांचे उदिष्ट त्यांना दिलेले असते.
आज एकाएका कृषी सहाय्यकांकडे १० ते १५ गावांचा कारभार असल्याचे चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे कृषी सहाय्यकांची रिक्त असलेली पदे त्वरीत भरावीत अशी आग्रही मागणी त्यांनी केली. या चर्चेत आमदार राम शिंदे यांनी सहभाग घेत कृषी सहाय्यक या पदनामात बदल करून सहाय्यक कृषी अधिकारी असे पदनाम करावे अशी मागणी केली.
सदरील प्रश्नाला उत्तर देतांना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी, कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून भरती करण्यात आलेली नव्हती असे सांगितले. तसेच पेसा अंतर्गत राज्यपाल महोदयांनी जे आदेश दिले आहेत तितके सोडून उर्वरित कृषी सहाय्यकांची रिक्त पदे १५ दिवसात जाहिरात काढून भरण्यात येतील, असे सभागृहात सांगितले. तसेच कृषी सहाय्यकांच्या पदनामात बदल करून ते सहाय्यक कृषी अधिकारी करण्यासाठी १५ दिवसात आपल्यासह संबंधिताची बैठक घेऊन यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सभागृहास आश्वस्त केले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….