खेडमध्ये मनसे-शिंदे गटात बॅनर वाद…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
खेड :- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाडव्याच्या मेळाव्याचा बॅनर पोलीस प्रशासनाने रविवारी (दि.१९) काढण्याचे आदेश दिले.
या आदेशानंतर मनसे नेते वैभव खेडेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
खेडमध्ये रविवारी (दि. १९) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निष्ठावंतांचा एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पूर्वीपासून शहरात मनसे नेते वैभव खेडेकर यांनी व त्यांच्या समर्थकांनी लावलेले बॅनर चर्चेचा विषय बनले होते. पोलीस प्रशासनाने रविवारी (दि.१९) हे बॅनर काढल्याची कारवाई केल्यानंतर वैभव खेडेकर यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनंतर खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही कारवाई शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या दबावापोटी केल्याचा आरोप केला. सुडापोटी मनसे संपवण्यासाठी ते सतत पद, पैसा यांचा वापर करत आहेत. त्यांची दहशत आम्ही झुगारून काम करत आहोत. मनसेला संपवण्यासाठी त्यांनी हे केल्याचा आरोप खेडेकर यांनी केला. राज ठाकरे यांच्याकडे आम्ही याबाबत सतत ही बाब सांगत असून यावेळी तरी राज ठाकरे दखल घेऊन कोकणातून मनसे वाचवण्यासाठी हे प्रकार थांबविण्यासाठी संबंधितांना सांगतील, अशी अपेक्षा यावेळी खेडेकर यांनी माध्यमांसोबत बोलताना व्यक्त केली.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….