“शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गेलं तरीही.”, छगन भुजबळ यांनी केलं उद्धव ठाकरेंचं कौतुक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात मोठं राजकीय स्थित्यंतर घडलं. एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली. या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली. मग, एकनाथ शिंदेंनी भाजपाबरोबर जात सत्ता स्थापन केली.
अलीकडे ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह आणि ‘शिवसेना’ नावही शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. पण, आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.
छगन भुजबळ यांच्या पंचाहत्तरीनिमित्त नांदेड येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा दिलेल्या प्रकट मुलाखतीत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “नाव आणि चिन्ह गेलं तरीही उद्धव ठाकरे धैर्याने उभे आहेत. आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे, असं वाटतं. सर्वस्व गमावल्यानंतर सुद्धा एक व्यक्ती उभा राहतो आणि हजारो लोकांना संबोधित करतो, ही सोप्पी गोष्ट नाही. याच्या जागी दुसरं कोण असतं, तर अंथरूण धरलं असतं. पण, हीच खरी कसोटी आहे, एखाद्या व्यक्तीमत्वाची.”
“अनेकजण म्हणतात मी समाजकारणी, राजकारमी, वक्ता, महापौर झालो. पण, कोणती हे सांगत नाही की जेलयात्रा सुद्धा आहे. जे म्हटल्यावर सर्वाना भीती वाटणार. ती काय आरामदायी यात्रा नसते. जेल काय असतं ते अडीच वर्ष आतामध्ये राहिल्यावर कळलं. मात्र, तेव्हा सर्वात जास्त सहकार्य अनेक पुस्तकं आणि वर्तमानपत्रांचं मिळालं,” असं छगन भुजबळांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीसांना कायम मुख्यमंत्री की विरोधी पक्षनेते म्हणून पाहायला आवडेल, असं विचारला असता छगन भुजबळांनी म्हटलं, “देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षनेते म्हणून पाहायला आवडणार. कारण, ते विरोधी पक्षनेते म्हणून चांगलं काम करतात.”

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….