भांग पिऊन सत्तेवर बसलेल्यांची भांग कसबा निवडणुकीत उतरली ; संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
भांग पिऊन सत्तेत आलेल्यांचाी भांग उतरली की सत्ता जाईल. आम्ही पूर्ण शुद्धीत आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
आमच्या काही मित्रांना मागच्या काळात कुणीतरी खोटं सांगून भांग पाजली होती. कुणी गाणं म्हणत होतं, कुणी रडत होतं अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली होती. त्यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी म्हटलं की,
महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आले सगळ्यांना माहिती आहे. भांग उतरली की त्यांची सत्ता नक्कीच जाईल.
आम्ही पूर्ण शुद्धीत आहोत. महाराष्ट्राची जनता किती शुद्धीत आहे हे कसब्याच्या निवडणुकीवरून स्पष्ट झालं आहे. जे भांग पिऊन सत्तेवर बसलेले आहेत त्यांना कळेल की महाराष्ट्र आणि राज्याची जनता काय आहे आणि त्यांची सगळी भांग कसब्यामध्ये उतरली आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांचा एक फोटो ट्वीट करत म्हटलं की, विरोधक भांग प्यायले असे श्रीमान देवेंद्र फडणवीस म्हणतात. हा सुद्धा नशेचा अतिरेक आहे. बांधावर पिकं आडवी झाली. शेतकऱ्यांच्या आयुष्याची धूळधाण झाली आणि सरकार धुळवडीच्या रंगात नाहून निघालं. ही सत्तेची चढलेली भांग नाहीतर काय? असा सवाल राऊतांनी विचारला.

देशातील परिस्थिती आणि राज्यातील परिस्थिती एकच आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल तर तुम्हाला देशद्रोही ठरवलं जातं. आम्ही या लोकांना घाबरत नाही. अतिशय बेकायदेशीरपणे नाव आणि चिन्ह काढून घेतलं तरी शिवसैनिक लढतो आहे. काल सुद्धा लालू यादव यांच्यावर धाडी पडल्या पण गौतम अदानींना नोटीस पण बजावली नाही. धाडी कोणावर टाकताय विरोधी पक्षावर, जे चुकीचे आहे. त्यांच्याविरोधात आम्ही उभे राहणार, असंही संजय राऊतांनी म्हटलं.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….