“परीक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा, सरकार काय झोपलंय का..?”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “बारावीचे पेपर सुरु आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा येथे परीक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा… पेपरफुटीचे प्रकार असे वारंवार घडतायच कसे, सरकार काय झोपलंय का?” असा संतप्त सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पेपरफुटी प्रश्नी सरकारला चांगलेच धारेवर धरले.
अभ्यास करणाऱ्या मुलांचे हे नुकसान असून या मागे कोणत रॅकेट कार्यरत आहे का? त्याचा तपास करुन अशा गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.
“बारावीचे पेपर सुरु आहेत. आज सकाळी साडे दहा वाजताच बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा येथे गणिताचा पेपर फुटला. गेल्या काही दिवसात राज्यात पेपरफुटीचे प्रकार वाढले आहेत. अभ्यास करणाऱ्या मुलांवर हा अन्याय आहे. पेपरफुटीच्या मागे कोणते रॅकेट कार्यरत आहे का ? याची सखोल चौकशी केली पाहिजे,” असे अजित पवार म्हणाले.
बारावीची परीक्षा देणाऱ्या मुलांचे हे नुकसान आहे. दोषीवर कठोर कारवाई करुन राज्यात सातत्याने सुरु असणारे असे गैरप्रकार थांबले पाहिजेत. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….