रोहयो च्या कामाचे मस्टर काढण्यासाठी सरपंच संघटनेचा आंदोलनाचा ईशारा ; सिओंना दिले निवेदन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
रोहयो च्या कामाचे देयक काढण्यावर गटविकास अधिकारी यांनी बहिष्कार टाकल्याने अनेक मजुरांच्या घामाचे पैसे मिळत नसल्याने हे मजुर आर्थिक अडचणीत सापडले आहेत त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी टाकलेला बहिष्कार तत्काळ मागे घ्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा सरपंच संघटनेने दिला आहे.
पंचायत समिती महागाव येथील गटविकास अधिकारी यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काम केलेल्या मजुरांचे मास्टर (देयके) काढण्याकरिता बहिष्कार टाकला असून अनेक रोज मजुरांचे देयके थांबले आहेत त्यामुळे त्यांच्या त्यांना अनेक आर्थिक अडचणींच्या समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे
ग्रामपंचायत अंतर्गत नवीन उद्दिष्ट गुरांचे गोठे, शेड, सिंचन विहीर पूर्ण करण्याकरिता अडचणी निर्माण होत आहेत गट विकास अधिकारी यांनी या कामांचे देयके काढण्यासाठी बहिष्कार टाकला असुन यामुळे कामावरील मजुरांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे त्यांनी टाकलेला बहिष्कार जर येणाऱ्या काही दिवसात सोडविला नाही तर महागाव तालुक्यातील ७६ ग्रामपंचायत सरपंच संघटना ८ मार्च पासुन उपोषण आंदोलनाला सुरुवात करेल असा ईशारा सरपंच संघटना अध्यक्ष अमोल चिकणे, विकास जाधव ,श्रीधर भवानकर, वैभव बर्डे ,दिगंबर राजने ,गजानन बुडाळ, संतोष कोरके ,दिनेश रावते यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
ग्राम सेवक संघटनेने राज्यभर रोहयोचे मस्टर(देयक) काढण्यास नकार दिला आहे व त्यांनी त्यावर बहिष्कार टाकला आहे असे असतांनाही तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना घरकुल उभारणीसाठी अडचण येवु नये मी स्वतः मस्टर काढत आहे.
ज्ञानेश्वर टाकरस गटविकास अधिकारी पं. स.महागाव
गटविकास अधिकाऱ्यांना देयके काढण्याचा अधिकार असतांना ते फक्त घरकुलाचे देयक काढत आहे परंतु सिंचन विहीर,गुरांचा गोठा, शेड या कामांची देयके काढण्यास नकार देत आहेत.फक्त घरकुलच नियमात बसते का?बाकी कामे नियमबाह्य आहेत का तसे असेल तर त्यांनी तसे आदेश द्यावे जेणे करून ग्राम पंचायत स्तरावर ती कामे करणे बंद करावे लागेल व मजुरांची सुद्धा फसवणूक टाळता येईल.
अमोल चिकणे अध्यक्ष सरपंच संघटना महागाव

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….