दिल्ली पालिकेत आप-भाजपमध्ये हाणामारी ; स्थायी समिती निवडणूक निकालावरून गोंधळ…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- दिल्ली महानगरपालिकेत आप आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये शुक्रवारी तुंबळ हाणामारी झाली. स्थायी समिती निवडणुकीत महापौर शेली ओबेरॉय यांनी एक मत अवैध ठरवल्यानंतर हाणामारीला तोंड फुटले.
या गदारोळात ‘आप’चे अशोक मनु हे नगरसेवक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्थायी समिती सदस्य निवडणुकीत एक मत अवैध ठरवण्याची घोषणा महापौर शेली ओबेरॉय यांनी केल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. त्यातून दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकमेकांना भिडले.
एका चित्रफितीमध्ये दोन्ही पक्षांचे नगरसेवक सभागृहात एकमेकांवर पाण्याच्या बाटल्या आणि सफरचंद फेकताना, तर दुसऱ्या एका चित्रफितीत महिला नगरसेवक सभागृहात एकमेकांना मारहाण करताना दिसतात. काही नगरसेवकांचे कपडेही फाटल्याचे समाजमाध्यमांवर पसरलेल्या चित्रफितींमध्ये दिसते.
पराभवाच्या नैराश्यातून भाजपच्या नगरसेवकांनी महापौर शेली ओबेरॉय यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप ‘आप’च्या आमदार आतिशी यांनी केला, तर ही हाणामारी ‘आप’मुळे झाल्याचा आरोप भाजपचे स्थायी समिती निवडणुकीतील उमेदवार पंकज लुथरा यांनी केला. भाजपच्या गुंडांनी महिला आणि महापौरांवरही हल्ला केला, असे आपचे नगरसेवक अशोक मनु म्हणाले.
काय घडले?
सहा सदस्यांच्या स्थायी समितीची निवडणूक सकाळी ११ च्या सुमारास सुरू होऊन दुपारी अडीचच्या सुमारास संपली. त्यानंतर १० मिनिटांनी मतमोजणीला सुरुवात झाली. ही प्रक्रिया दोन तासांहून अधिक वेळ चालली. महापौर शेली ओबेरॉय यांनी अवैध मताशिवाय निकाल जाहीर करण्याची घोषणा केली. त्याला भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केला. तेथूनच गोंधळ सुरू झाला आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….