धम्मक्रांती प्रज्ञापर्व समिती २०२३ च्या अध्यक्षपदी किशोर कांबळे यांची निवड….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- धम्मनायक सम्राट अशोक व महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती धम्मक्रांती प्रज्ञापर्व समिती पुसद २०२३ च्या अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम संभाजीनगर येथील बुध्दविहारात २२फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५:०० वाजता पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धम्मक्रांती प्रज्ञापर्व समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा धम्मभूषण पुरस्कार प्राप्त भीमराव कांबळे उपस्थित होते.तर प्रमुख अतिथी म्हणून २०२२चे अध्यक्ष विठ्ठल खडसे, व प्रज्ञापर्व २०२२ची संपूर्ण समिती सदस्य प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
मावळते अध्यक्ष विठ्ठल खडसे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण ,सौंदर्यकरण करण्याच्या मागणीसाठी केलेल्या कार्याबद्दल समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर नरेंद्र पाटील यांनी मागील वर्षाचा लेखाजोखा वाचून दाखविला वअध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात केली या नियोजित केलेल्या कार्यक्रमाला पुसद मधील समस्त प्रत्येक वार्डातील सन्माननीय व्यक्ती व मान्यवर समाज बांधवव महिला बहुसंख्येने उपस्थित होते.
धम्मक्रांती प्रज्ञापर्व समिती २०२३च्या अध्यक्षपदासाठी किशोर कांबळे ,इंजिनीयर महेंद्र कांबळे ,स्वप्नील पाईकराव, देवा जगताप, यांनी इच्छुकता दर्शविली यासाठी मतदान प्रक्रियेतून अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. यामध्ये किशोर कांबळे हे बहुमताने अध्यक्षपदी निवडून आले.
धम्मक्रांती प्रज्ञापर्व समिती २०२३ च्या अध्यक्षपदी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांची निवड झाल्याबद्दल सर्व समाज स्तरातून त्यांच्यावरअभिनंदनचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दीपक भवरे यांनी केले या कार्यक्रमास तरुण मंडळी, महिला तथा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….