ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. वसंतराव चिद्दरवार यांच्या जयंती निमित्त ॲड. सुशिल अत्र यांचे कायदेविषयक व्याख्यान संपन्न….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- पुसद न्यायालयात फौजदारी व दिवाणी दावे चालतात तेव्हा वैद्यकीय न्याय शास्त्र आधार घ्यावा लागतो. मेडीकल ईव्हेंट तपासावी लागतात. मृत्युशी संबंधित बाजु जखमा जिवंतपणी व मृत्युपुर्वी ओळख साबीत करणे गरजेचे आहे. मृत्युचे कारण व वेळ कोर्टात साबीत होणे गरजेची आहे. या सर्व बाबीसाठी पि.एम. रिपोर्ट गरजेचा असतो. असे प्रतिपादन ॲड. सुशिल अच्युतराव अत्रे जळगांव यांनी केले. दि. ९ फेब्रुवारी रोजी न्याय मंदिरात
पुसद बार असोशिएशनचे दिवंगत सदस्य ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. वसंतरावजी चिद्दरवार यांचे जयंती निमित्त कायदेविषयक व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते.
वैद्यकीय न्यायशास्त्र या विषयावर ॲड. सुशिल अत्रे यांनी मुद्देसुध्द आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल चे माजी अध्यक्ष ॲड. आशिष देशमुख यांनी ॲड वसंतराव चिद्दरवार अण्णानी पुसद ला डिस्ट्रिक्ट कोर्ट आणण्यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न व वकील वर्गासाठी केलेले कार्य बाबत माहिती दिली. तर प्रमुख अतिथी अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश व्ही.बी. कुलकर्णी यांनी सुद्धा स्व वसंतराव चिद्दरवार यांच्या बद्दल प्रकरण आणि माणसे हाताळण्याची हातोटी बाबत चे काही अनुभवातील प्रसंग सांगून मार्गदर्शन केले. पुसद बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. शिवाजी खराटे, प्रमुख मार्गदर्शक ॲड. सुशिल अत्रे, ॲड. पदमानंद देशपांडे जळगांव, ॲड.अतुल चिद्दरवार, डॉ. सतिष चिद्दरवार व जयंत चिद्दरवार इ. मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी कै. वसंतराव चिद्दरवार यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक ॲड. शिवाजी खराटे यांनी केले. कै.
वसंतराव चिद्दरवार, एक शिस्तबध्द वकील म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्याकडून आम्हा सर्वांना बरेच काही शिकता आले. त्यांच्या जयंती निमित्त वकील वर्गांना वैद्यकीय न्यायशास्त्राबद्दल माहिती मिळावी. यासाठी ॲड. आशिष देशमुख यांच्या संकल्पनेतुन हा कार्यक्रम घेण्यात आला. अशी माहिती ॲड. शिवाजी खराटे यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. यावेळी कार्यक्रमाचे प्रभावी सुत्रसंचालन पुसद वकील संघाचे सचिव गोपाल मस्के यांनी तर उपस्थितांचे आभार अँड मंगेश यावले यांनी मानले.