KCR यांच्या पक्षाची जबाबदारी कुणाकडे…? महाराष्ट्रात ‘या’ तीन नेत्यांच्या नावांची चर्चा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाची महाराष्ट्रात जबाबदारी कुणाकडे असेल? याविषयी सध्या तर्क लावले जात आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील तीन नेत्यांची नावं प्रामुख्यानं समोर येत आहेत.
मागच्या काही दिवसांपासून के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात लक्ष घातल्याचं दिसून येत आहे. नांदेडमध्ये त्यांची झालेली सभा आणि त्यांनी मांडलेले शेतकऱ्यांचं प्रश्न पाहता महाराष्ट्रात पाय रोवायला ते सज्ज असल्याचं दिसून येत आहे.
नांदेडमध्ये त्यांनी ‘अब कि बार किसान सरकार’ अशी घोषणा दिली आहे. सभेत बोलताना त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर जोरदार टीका केली. शेतकरी आत्महत्या, पाणी प्रश्न अशा विविध प्रश्नांवर त्यांनी भाष्य केलं.
तर त्यांनी काँग्रेसवरही टीका केली, ते म्हणाले मागील ७० वर्षात सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणतीच कामे केली नाहीत. आत्तापर्यंत सगळे आमदार-खासदार झाले पण आता शेतकऱ्याला पुढे यावं लागेल.
केसीआर यांना महाराष्ट्रात पाय रोवायचे असतील तर इथल्या मातीतला नेता त्यांना सोबत घ्यावा लागले. त्यासाठी आघाडीवर असलेलं नाव राजू शेट्टी यांचं आहे. त्यांची भेटही झालेली आहे.
त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबतही केसीआर यांची भेट झाली. तर प्रकाश आंबेडकर हे तेलंगणा विधानसभेच्या नवीन इमारत उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे केसीआर यांना कोण सोबत करणार, हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….