राज्यात थंडीची लाट कायम ; आठ ते दहा दिवस कडाक्याची थंडी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- उत्तरेकडून येणार्या थंड वार्यांमुळे राज्यात थंडीची लाट कायम असून, पुढील आठ ते दहा दिवस कडाक्याची थंडी राहणार आहे. किमान तापमानात थोडासा चढ-उतार राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सलग तिसर्या दिवशी राज्यात जळगाव शहराचे तापमान नीचांकी नोंदले असून, तेथे तापमानाचा पारा 7.5 अंशांवर पोहोचला आहे. पुण्यातील किमान तापमान 8.1 अंश सेल्सिअस होते.
काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई तसेच कोकणात थंडी वाढली आहे. विदर्भ व उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत तसेच परभणी, गोंदिया, अकोला, बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांतही थंडीचा कडका कायम आहे.
पुणे, सातारा, सांगली, महाबळेश्वर, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतही किमान तापमानात घट झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांश शहरांत सकाळी दाट धुके पडणार आहे. तसेच पुढील आठ ते दहा दिवस थंडीची लाट राहणार आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….